Citizens of metropolitan cities will return to villages : देशात सन २०३० नंतर पुन्हा एकदा गड्या, आपुला गाव बरा'ची प्रचिती येणार, महानगरांतील नागरिक खेड्यांकडे वळणार!

परराष्ट्र धोरण विषयाचे  तज्ज्ञ डॉ. अंकित शाह यांचे भाकित : देशात आयटी संस्कृतीतून शेती संस्कृतीकडे वाटचाल होणार 

Citizens of metropolitan cities will return to villages : देशात सन २०३० नंतर पुन्हा एकदा गड्या, आपुला गाव बरा'ची प्रचिती येणार, महानगरांतील नागरिक खेड्यांकडे वळणार!
पुणे:- डॉ. अंकित शहा व्याख्यान देताना. बाजूला अविनाश धर्माधिकारी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २८ ऑक्टोबर २०२५ :- भारता सन २०३० नंतर पुन्हा एकदा गड्या, आपुला गाव बरा' या उक्तीची ची प्रचिती येणार आहे. कारण देशातील महानगरांतील वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे नागरिकांना महानगरात राहणे मुश्किल होईल.परिणामी पुणे, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद यांसारख्या महानगरांमधील नागरिक दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरांकडे व शेतीकडे पुन्हा वळतील. प्रयायाने यातून खेड्यांकडे चला, या महात्मा गांधींच्या घोषणेचा प्रत्याक्षात प्रत्यय येईल.शिवाय सन २०३५ पर्यंत देशी गाई, स्वदेशी शेती, पद्धती ही पुन्हा केंद्रस्थानी येईल. यामुळे देशातील समाज आयटी संस्कृतीकडून कृषी संस्कृतीकडे वळण घेईल, असे भाकीत परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयातील तज्ज्ञ डॉ. अंकित शाह यांनी पुणे येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले. डिग्लोबलायझेशनच्या युगात परकीय निधीवर चालणारे अनेक स्टार्टअप्स बंद पडण्याची शक्यता असल्यचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
पुण्यातील नेशन फर्स्ट आणि चाणक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने “डिग्लोबलायझेशन अँड इमर्जन्स ऑफ सनातन इकॉनॉमिक्स मॉडेल” या विषयावर डॉ. शाह यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते.

डॉ. अंकित शाह पुढे म्हणाले, "येत्या पाच वर्षांत चलन व्यवस्थेतील बदलांमुळे शेती, उत्पादन,लॉजिस्टिक्स, संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातच खरी मूल्यनिर्मिती होणार आहे. त्यामुळे नव्या पदवीधरांना अवास्तव वेतन देणारे तथाकथित "फेक जॉब्स" लवकरच संपुष्टात येतील. सध्याच्या काळातील "डी-डॉलरायझेशन व डिग्लोबलायझेशनच्या युगात परकीय निधीवर चालणारे अनेक स्टार्टअप्स बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे युवकांना शेती, उत्पादन, खाद्य प्रक्रिया, लॉजिस्टिक्स, संरक्षण आणि अवकाश या मूळ क्षेत्रांकडे परतण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मुख्य क्षेत्रांकडून आपले लक्ष हटविण्यासाठी आयटी क्षेत्राला जाणूनबुजून अतिरंजक करण्यात आले. ई-कॉमर्समध्ये डॉलरचे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून लघु व्यापारी व स्थानिक उद्योजकांचे उत्पन्न कमी करण्याचा डाव रचला गेला आहे."

यावेळी बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले,"अब्राह्मिक अर्थशास्त्र केवळ एक जन्म मानून भौतिक सुखभोगावर केंद्रीत असते, तर सनातन इकॉनॉमिक्स हे कर्म–फल सिद्धांतावर आधारित असून निसर्गचक्रातील संतुलन राखण्यावर भर देते. आपण जे काही घेतो ते परत देण्याची जबाबदारी आपली आहे. कारण आपण पुन्हा या पृथ्वीवर येणार आहोत” या कार्यक्रमाला पुणे, मुंबई, हैदराबाद आणि कोकण विभागातील सुमारे ५०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.