School students : शालेय विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप!

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालींदर कामठे यांचा अनोखा उपक्रम : वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा

School students : शालेय विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप!

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २० जून २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना १ लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. 

वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने दिवंगत अजित पवार आणि दिवंगत  मातोश्री हौसाबाई सोपानराव कामठे यांच्या स्मरणार्थ समाजातील गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना एक लाखांच्या शिष्यवृत्तीचे तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. 

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक मदत, वह्या, पुस्तके, दप्तर व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आल्याचे जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी वाढदिवस साजरा करण्याची ही सामाजिक व विधायक पद्धत असल्याचे मत या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही मिळालेल्या शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्यामुळे शिक्षणासाठी अधिक प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी जालींदर कामठे यांनी व्यक्त केला. 

याप्रसंगी बजरंग वाघ, सुखदेव लोणकर, शिवाजी मरळ,  मधुकर धांडेकर, अमोल धर्मावत, शिरीष धर्मावत,  चिंतामण जगताप, नरेश बनसोडे, पोपट कामठे, राजेंद्र कोलते,  प्राचार्य भानुदास रिठे, सुनिता रायडू, संतोष आबनावे, नंदकुमार पांडे, विवेकानंद ससाणे, दत्ता चव्हाण,  मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, सारिका जगताप, संदीप देवकर, सचिन पठारे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.प्राचार्य भानुदास रिठे यांनी प्रास्ताविक केले.संभाजी साबळे यांनी सूत्रसंचालन केले.मुख्याध्यापिका सुरेखा कोलते यांनी आभार मानले.