सूर्यवंशी vs बुमरा! गुवाहाटीत मुंबई-राजस्थानचा आज हायव्होल्टेज क्लॅश .

गुवाहाटीत आज होणाऱ्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार असून, पाच वेळची चॅम्पियन मुंबई आणि सलग विजयांच्या लयीत असलेली राजस्थान यांच्यात हायव्होल्टेज लढत रंगणार आहे.

सूर्यवंशी vs बुमरा! गुवाहाटीत मुंबई-राजस्थानचा आज हायव्होल्टेज क्लॅश .

गुवाहाटी : आयपीएल टी-२० स्पर्धेत आज (दि.७) क्रिकेट चाहत्यांना तुफान थरार अनुभवायला मिळणार आहे. पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि जबरदस्त फॉर्मात असलेली राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ ताकदीने जवळपास सारखेच असल्याने हा सामना ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा रंगणार आहे. मात्र, सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत त्या युवा स्टार वैभव सूर्यवंशी आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमरा यांच्या रोमांचक द्वंद्वाकडे!

फलंदाज vs गोलंदाज – खरी लढत इथेच!

राजस्थानचा १५ वर्षीय सनसनाटी फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्याची आक्रमक फलंदाजी विरोधी संघांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पण आज त्याच्यासमोर उभा राहणार आहे जगातील सर्वात धोकादायक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट – जसप्रीत बुमरा!
या दोघांमधील सामना कोण जिंकतो, यावरच मॅचचा निकाल अवलंबून असू शकतो.

मुंबईची बॅटिंग फौज सज्ज

मुंबईकडे रोहित शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या अशी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. गोलंदाजीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट ही वेगवान जोडी प्रतिस्पर्ध्यांना हादरवण्यासाठी तयार आहे. मोठी अपडेट हार्दिक पंड्या आज पुनरागमन करण्याची शक्यता, त्यामुळे प्लेइंग-११ मध्ये बदल होऊ शकतो.

राजस्थानचा आत्मविश्वास टॉपवर

राजस्थान रॉयल्स सलग विजयांच्या लयीत आहेत. यशस्वी जैस्वाल आणि सूर्यवंशी यांची आक्रमक सुरुवात, तर रियान पराग, ध्रुव जुरेल आणि हेटमायर यांची फिनिशिंग टीमला मोठा फायदा करून देते.
गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि रवी बिश्नोई ही तिकडी सामन्याचा रंग बदलू शकते.

इम्पॅक्ट प्लेयर गेम प्लॅन

मुंबई : सूर्यकुमार यादव किंवा बुमरा/बोल्ट यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरण्याची शक्यता

राजस्थान : रवी बिश्नोई आणि डोनोव्हन फरेरा यांच्यातील अदलाबदल परिस्थितीनुसार होऊ शकते.

संभाव्य प्लेइंग-११

राजस्थान रॉयल्स :
रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, डोनोव्हन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.

मुंबई इंडियन्स :
हार्दिक पंड्या (कर्णधार), रायन रिकल्टन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफेन रूदरफोर्ड, मिचेल सॅन्टनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा.


मॅच प्रेडिक्शन

दोन्ही संघ दमदार असले तरी राजस्थानचा सध्याचा फॉर्म आणि आत्मविश्वास त्यांना किंचित आघाडीवर ठेवतो. पण मुंबईसारख्या अनुभवी संघाला कमी लेखणं धोकादायक ठरू शकतं!आजचा सामना ‘युवा जोश vs अनुभव’ असा असणार आहे. आणि त्यात सूर्यवंशी-बुमरा द्वंद्व ठरणार गेमचेंजर!