Keralam Renaming: “केरल”चे “केरलम”मध्ये रूपांतर; केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, सांस्कृतिक ओळखीला नवे बळ.

केरल”चे अधिकृत नाव आता “केरलम”; केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, सर्व सरकारी कागदपत्रांत लवकरच नवे नाव दिसणार.

Keralam Renaming: “केरल”चे “केरलम”मध्ये रूपांतर; केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, सांस्कृतिक ओळखीला नवे बळ.
“Renaming ‘Kerala’ to ‘Keralam’.”

केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव “केरलम” करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. आता संबंधित विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर सर्व सरकारी कागदपत्रे, नकाशे, परीक्षा फॉर्म आणि प्रशासकीय नोंदींमध्ये “केरलम” हे नाव दिसणार आहे.मलयाळम भाषेतील उच्चाराशी जुळणारे हे नाव खरेतर राज्याच्या स्थापनेपासूनच लोकाभिमुख वापरात होते.भाषाप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी काही विरोधकांनी नावबदलापेक्षा रोजगार व महागाई अशा मुद्द्यांना प्राधान्य द्यावे, अशी टीका केली आहे.राज्य सरकार मात्र हा बदल सांस्कृतिक स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचा दावा करत आहे.