पुणे

ग्रामराज्य वृत्तसेवा
...
Maharashtra Assembly
पुणे, दि. ५ नोव्हेंबर २०२४ :- विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. मात्र ही कारवाई म्हणजे केवळ मलमपट्टी असल्याची भावना व्यक्त करत, ही कारवाई किती दिवस टिकणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करु लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरला संपली. या मुदतीत अनेक उमेदवारांनी माघार न घेता आपापल्या पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले आहेत. हे बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ५ नोव्हेंबरपासून या बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. मात्र ऐनवेळी यापैकी काही प्रमुख बंडखोर उमेदवारांना शांत करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश मिळाले आहे. अनेक मतदारसंघात अजूनही बंडखोरी कायम असून त्याचा निवडणूक निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे . बंडखोर उमेदवारांना आपापल्या पक्षातून निलंबित करण्याची कारवाई आता सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. परंतु ही कारवाई म्हणजे केवळ निवडणुकीच्या तोंडावर दाखवण्यासाठी सुरू झालेली कारवाई आहे. त्यामुळे ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपातील मलमपट्टी ठरणार असल्याचे मत मतदार व्यक्त करु लागले आहेत. हेच बंडखोर उमेदवार निवडणुकीनंतर सन्मानाने पुन्हा आपापल्या पक्षात परततील आणि झाले गेले विसरून पक्षही त्यांना पुन्हा मानाची पदेसुद्धा देतील, असे मतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना वेड्यात काढण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा आता जाहीररीत्या सुरू झाली आहे . पक्षांतर्गत कारवाई ही आता शिक्षा राहिलेली नाही तर तिला राजकीय तडजोडीचे स्वरूप प्राप्त झाले असून केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी सुरू असलेल्या या राजकीय तडजोडी मतदारांनीच रोखणे आवश्यक बनल्याची सर्वसाधारण प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

आमच्याविषयी

ग्रामराज्य हे मराठी भाषेतील बातम्या आणि लेखांचे खास न्यूज पोर्टल (संकेतस्थळ) आहे. हे संकेतस्थळ सार्थसंकेत प्रकाशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील समाजोपयोगी दैनंदिन घडामोडी, बातम्या आणि लेख हे ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. समाजोपयोगी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरु केले आहे. यासाठी आम्ही आपल्याला www.gramrajya.com हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळाचा आपण सर्वजण लाभ घ्याल, अशी अपेक्षा.

धन्यवाद.

- मुख्य संपादक,
ग्रामराज्य न्यूज.

सविस्तर वाचा >>