कविसावे शतक हे आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे, हे सत्य आता आपल्याला नाकारता येणार नाही. या शतकाच्या पहिल्या दशकापासूनच मुद्रण व्यावसायात आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. याचाच काहीसा परिणाम हा मुद्रण व्यावसायावर झाला आहे. यामुळे या बदलाला सामोरे जाण्यासाठी आणि सार्थसंकेत प्रकाशनाचे साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी बदलत्या काळानुसार आम्हीही आता मुद्रित व्यावसायासोबतच डिजिटल माध्यमांचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. याची पहिली पायरी म्हणून "ग्रामराज्य न्यूज" हे ऑनलाईन बातम्यांसाठीचे पोर्टल (संकेतस्थळ) सुरू केले आहे.

या संकेतस्थळाच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी आणि विविध क्षेत्रातील बातम्यांबरोबरच महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारे विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक, सामाजिक चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आदींचे लेख, मुलाखती आणि त्या त्या क्षेत्रातील दैनंदिन घडामोडी या समाजासमोर मांडण्याचा आमचा मानस आहे.जेणेकरून हे संकेतस्थळ समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी आणि आर्थिक सक्षमतेसाठी उपयुक्त ठरू शकेल.

याशिवाय केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, 'केजी'पासुन 'पीजी'पर्यंतचे विविध क्षेत्रातील करिअरचे मार्ग, प्राथमिक शिक्षणापासून परदेशातील शिक्षणापर्यंत मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स आणि फेलोशिप्स, केंद्रीय पंचायतराज विभाग आणि राज्यातील ग्रामविकास विभागामार्फत ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा या त्रीस्तरीय पंचायतराज संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विकासाचे विविध उपक्रम, निर्णय आणि याचा लाभ घेण्यासाठी करावयाची प्रत्यक्ष कार्यवाही याबाबत भरीव जनजागृती करणे आणि त्याचा अधिकाधिक समाज घटकांना फायदा व्हावा, हा या "ग्रामराज्य न्यूज" सुरू करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश आहे.

केंद्र व राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, आरोग्य, कृषी,जलसंधारण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण पाणीपुरवठा, छोटे पाटबंधारे, बांधकाम, ग्रामपंचायत, स्वच्छता व पाणीपुरवठा, महिला बचत गटांच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठीचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि क्रीडा आदी विभागांच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.

या योजनांच्या माध्यमातून आणि स्वच्छता व समृद्धीच्या माध्यमातून विकसित झालेली गावे, उत्कृष्ट कामगिरी केलेले जिल्हा परिषदांचे आजी-माजी अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती, सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, उत्कृष्ट शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, महिला बचत गटांच्या महिला, महिला मंडळाच्या सदस्या, युवक मंडळे आदींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची योग्य दखल घेणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे.

याशिवाय महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, सहकारी, नागरी बँका, पतसंस्था, दूध संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, सामाजिक संस्था आदींसह विविध संस्थांच्या यशोगाथा प्रकाशित करण्यावर आमचा अधिक भर राहणार आहे.

अशा या समाजोपयोगी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देश या अनोख्या व वेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सार्थसंकेत प्रकाशनने आपल्याला www.gramrajya.com हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळाचा आपण सर्वजण लाभ घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.

कळावे,
प्रा. सौ. मीरा गजेंद्र बडे,
(B. Sc., M.S.W., Dip.In Human rights and counciling),
मुख्य संपादक,
ग्रामराज्य न्यूज,

ग्रामराज्य न्यूज पोर्टल'ची वैशिष्ट्ये

  • 'गल्ली ते दिल्ली'तील राजकीय घडामोडींची अद्ययावत माहिती.
  • जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमधील बातम्यांचा घरबसल्या मिळणार खजिना.
  • सकारात्मक, विकासात्मक आणि समाजोपयोगी बातम्यांवर अधिक भर.
  • चालू-घडामोडींवर आधारित विश्लेषणात्मक बातम्या व लेख
  • अगदी वाडी, वस्ती, गाव पातळीवरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामांवर प्रकाशझोत टाकणार.