पुणे

ग्रामराज्य न्यूज नेटवर्क
...
????????? ???? ???????????, ????.
पुणे, दि. २८ ओक्टॉबर २०२४ : पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये वसुबारस उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते सवत्स धेनूचे पूजन करण्यात आले. सध्याच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये देशी गाईंना अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्यांचे संगोपन, संवर्धन करून उत्पादनात भरीव वाढ घडविणे गरजेचे असल्याचे मत कुलगुरू डॉ. पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. देशी गोपालनाचे माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत व फायदेशीर उत्पादनाचा स्त्रोत निर्माण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला गुजरातमधील गांधीनगर येथील कामधेनू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत, डॉ. विलास भाले, डॉ. के. व्ही. प्रसाद, संजय शिंदे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुनील मासळकर, डॉ. धीरज कंखरे, देशी गाय केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने आदी होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थित पाहुण्यांनी गाईचे गोठे, गोपरिक्रमा, स्वयंचलित वातावरण नियंत्रित गोठा, फुले स्मार्ट हवामान केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प, गोबर गॅस संयंत्र व दुग्ध प्रक्रिया प्रयोगशाळा आदी ठिकाणी भेट दिली व शाश्वत देशी गोपालनाच्या मॉडेलची पाहणी करून या केंद्रावर सुरू असलेल्या देशी गाईंच्या संशोधनाबद्दल कौतुक व समाधान व्यक्त केले.

आमच्याविषयी

ग्रामराज्य हे मराठी भाषेतील बातम्या आणि लेखांचे खास न्यूज पोर्टल (संकेतस्थळ) आहे. हे संकेतस्थळ सार्थसंकेत प्रकाशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील समाजोपयोगी दैनंदिन घडामोडी, बातम्या आणि लेख हे ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. समाजोपयोगी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरु केले आहे. यासाठी आम्ही आपल्याला www.gramrajya.com हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळाचा आपण सर्वजण लाभ घ्याल, अशी अपेक्षा.

धन्यवाद.

- मुख्य संपादक,
ग्रामराज्य न्यूज.

सविस्तर वाचा >>