पुणे

ग्रामराज्य वृत्तसेवा
...
Pune, Oct. 30,2024 :-
दिवाळीच्या कालावधीत पुण्याहून आपल्या मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तब्बल ६५ खासगी बस चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याजवळून सुमारे साडेचार कोटी रुपये दंडाची वसुली केली आहे. दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत पुण्याहून आपल्या मूळगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी सध्या दिसून आली असून या गर्दीचा फायदा उठवण्याच्या दृष्टिकोनातून ऐनवेळी प्रवासी भाड्यात दुपटीहून अधिक वाढ करणे , नादुरुस्त बसगाड्या मार्गावर पाठवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे याशिवाय वाहन परवाना आणि अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता न करणे आदी विविध कारणांनी या बस चालकांवर कारवाई करण्यात आली आहे . गेल्या आठवडाभरापासून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या गाड्यांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत सुमारे ११० प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

आमच्याविषयी

ग्रामराज्य हे मराठी भाषेतील बातम्या आणि लेखांचे खास न्यूज पोर्टल (संकेतस्थळ) आहे. हे संकेतस्थळ सार्थसंकेत प्रकाशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील समाजोपयोगी दैनंदिन घडामोडी, बातम्या आणि लेख हे ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. समाजोपयोगी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरु केले आहे. यासाठी आम्ही आपल्याला www.gramrajya.com हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळाचा आपण सर्वजण लाभ घ्याल, अशी अपेक्षा.

धन्यवाद.

- मुख्य संपादक,
ग्रामराज्य न्यूज.

सविस्तर वाचा >>