पुणे जिल्ह्यात ९० हजारांहून अधिक दिव्यांग मतदार
चिंचवडमध्ये सर्वाधिक तर, मावळमध्ये सर्वात कमी संख्या
Disability voter's pune.
ग्रामराज्य न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १ नोव्हेंबर २०२४ :- पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मिळून जिल्ह्यात ९० हजार १३४ दिव्यांग मतदार आहेत. यापैकी सर्वाधिक १२ हजार १०१ दिव्यांग मतदार हे चिंचवड तर, सर्वात कमी दिव्यांग म्हणजे केवळ १ हजार ६८९ दिव्यांग मतदार हे मावळ विधानसभा मतदारसंघात आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदारसंघात विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (दि. १ नोव्हेंबर) सांगितले.
पुणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांमध्ये अस्थिव्यंग, कर्णबधिर, अल्पदृष्टी आणि इतर प्रकारच्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, पुरेशा व्हील चेअर्स, वाहन व्यवस्था, स्वतंत्र रांगा, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक, सहायक, प्रतिक्षालय आणि ९२२६३६३००२ हा हेल्पलाईन क्रमांक आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ‘सक्षम’ ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांच्या मागणीप्रमाणे मतदारसंघनिहाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांची विधानसभानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:-
१) जुन्नर ---- १ हजार ९१७.
२) आंबेगाव --- २ हजार ७७६.
३) खेड- आळंदी --- ३ हजार ६१२.
४) शिरुर --- ३ हजार ९८६. ५) दौंड --- ३ हजार १८०.
६) इंदापूर --- २ हजार १२.
७) बारामती --- ४ हजार ९८०.
८) पुरंदर --- ४ हजार ३१३.
९) भोर --- ६ हजार ८०.
१०) मावळ --- १ हजार ६८९.
११) चिंचवड --- १२ हजार १०१.
१२) पिंपरी --- ४ हजार २५१.
१३) भोसरी --- ७ हजार १४३.
१४) वडगावशेरी --- ३ हजार ५३७.
१५) शिवाजीनगर --- २ हजार २१६.
१६) कोथरुड --- २ हजार ८१४.
१७) खडकवासला --- ३ हजार ४३९.
१८) पर्वती --- ३ हजार ४४०.
१९) हडपसर --- ७ हजार ६१५.
२०) पुणे कॅन्टोन्मेंट --- ५ हजार १००.
२१) कसबा पेठ ---४ हजार ८६८.