पुण्यात येत्या २१ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती प्रदर्शन
पुणेकरांना आंतरराष्ट्रीय हार्टीकल्चर प्रदर्शन पाहण्याची सुवर्णसंधी
Organisers giving information regarding horticulture exhibition in a press conference
ग्रामराज्य न्यूज
पुणे, दि. १८ नोव्हेंबर २०२४ :- भारतातील सर्वात मोठे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानवर आधारित प्रदर्शन यंदा पुणे शहरात आयोजित करण्यात आले आहे. येत्या गुरुवारपासून (दि.२१ नोव्हेंबर) हे प्रदर्शन भरणार असून, यामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय हार्टीकल्चर प्रदर्शन पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
हे प्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानात दि. २१ ते हे प्रदर्शन भरणार आहे. मैदान (सिंचगर) येथे पार पडणार आहे. याचे उद्घाटन २१ नोव्हेबर रोजी २४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत भरणार आहे. या प्रदर्शनाचे २१ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता सीमा सुरक्षा दलाचे उपायुक्त राजा बाबू सिंग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वसू इव्हेंट व हॉस्पिटॅलिटी आणि महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक विजय बोत्रे, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप हे उपस्थित राहणार आहेत.
या हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पहायला मिळणार आहेत. शिवाय हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी होणार असून या वेळी हॉर्टिकल्चर तज्ज्ञ हे शेतकरी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने, महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत चौधरी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला आनंद कांचन, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, नेहा त्यागी आदी उपस्थित होते.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला जास्तीतजास्त पुणेकरांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.