'सीबीएसई'च्या प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल प्रथम
बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
award ceremony
ग्रामराज्य न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १८ नोव्हेंबर २०२४ :- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुण्यातील अमनोरा येथे सी.बी.एस.ई च्या आयोजित करण्यात आलेल्या सन २०२४-२५ च्या प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हा या विज्ञान प्रदर्शनाचा विषय होता. यामध्ये बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलने सात श्रेणींमधील एकूण शंभर प्रकल्पांतून पहिला क्रमांक पटकावला आहे.
या प्रदर्शनात या शाळेने नैसर्गिक शेती या श्रेणीमध्ये हायड्रोपोनिक्स फार्मिंग बेस्ड लिक्विड फर्टीलायझर मशीन हा प्रकल्प सादर केला होता. इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला भावेश सांगळे या विद्यार्थ्यांने या मशीनविषयी परीक्षकांना माहिती देत प्रात्यक्षिक करून दाखवले. या प्रकल्पातील मशीनद्वारे कमी जागा व कमी खर्च आणि विनामातीचे फर्टिलायझर वापरून आधुनिक पद्धतीने अधिकाधिक उत्पन्न घेता येणे शक्य होणार आहे.
या शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक योगिता मुळे व साईनाथ टाळे यांनी भावेश सांगळे याला हा प्रकल्प सादर करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. निवडीमुळे या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.
दरम्यान, शाळेचे अध्यक्ष सदाशिव पवार, प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, उपप्राचार्या प्रणिता शेळके यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.