पुणे

ग्रामराज्य वृत्तसेवा
...
Umedwari aarj dakhal kartana Hulgesh Chalwadi
पुणे, दि. २९ ऑक्टोबर २०२४:- पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीने (बसपा) तगडे आव्हान दिले आहे. या मतदारसंघातून बहुजन नेते आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक हुलगेश चलवादी हे निवडणुकीच्या ​रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात बहुजन समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने पुन्हा एकदा प्रस्थापित राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात बसपाने प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी आणि माजी नगरसेवक हुलगेश चलवादी यांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी चलवादी यांनी बसपा समर्थक आणि पदाधिकार्यांच्या उपस्थित येरवडा येथील प्रादेशिक कार्यालयात त्यांचा अर्ज भरला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रस्थापित पक्ष आतापर्यंत कष्टकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांबरोबरच पीडित, शोषित आणि उपेक्षितांची दिशाभूल करीत त्यांची थट्टा करीत आले आहेत. सर्वसामान्य मतदारांचा केवळ मतदानापुरता वापर करीत​ निवडून आल्यानंतर त्यांच्या मुळ प्रश्नांना बगल देण्याची स्पर्धाच प्रस्थापित पक्षांमध्ये पहायला मिळत आहे . सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे प्रतिनिधित्व कायदेमंडळात जाणे आवश्यक असल्याने निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे हुलगेश चलवादी यांनी यावेळी सांगितले. एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत असल्याने सर्वच नागरिक जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन पाठीशी उभे राहतील,असा विश्वासही चलवादी यांनी व्यक्त केला. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चलवादी यांनी पुणे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. उमेदवारी अर्ज दाखल करतांना चलवादी यांच्यासोबत बसपचे प्रदेश सदस्य सुदीप गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीत कुसाळे, पुणे जिल्हा प्रभारी महंमद शफी, शीतल गायकवाड यांच्यासह सर्व धर्माचे धर्मगुरू, सर्व समाज बांधव आणि पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

आमच्याविषयी

ग्रामराज्य हे मराठी भाषेतील बातम्या आणि लेखांचे खास न्यूज पोर्टल (संकेतस्थळ) आहे. हे संकेतस्थळ सार्थसंकेत प्रकाशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील समाजोपयोगी दैनंदिन घडामोडी, बातम्या आणि लेख हे ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. समाजोपयोगी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरु केले आहे. यासाठी आम्ही आपल्याला www.gramrajya.com हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळाचा आपण सर्वजण लाभ घ्याल, अशी अपेक्षा.

धन्यवाद.

- मुख्य संपादक,
ग्रामराज्य न्यूज.

सविस्तर वाचा >>