Maharashtra day : महाराष्ट्र राज्याचे वैविध्य आणि संस्कृती जपा - वास्तुविशारद कोंढरे!  

येवलेवाडी येथील कामठे माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा! 

Maharashtra day : महाराष्ट्र राज्याचे वैविध्य आणि संस्कृती जपा - वास्तुविशारद कोंढरे!  

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १ मे २०२६ :- महाराष्ट्र राज्याचे वैविध्य आणि संस्कृती जपण्याचे काम हे भावी पिढीने करावे, असे आवाहन प्रसिद्ध वास्तुविशारद लक्ष्मण कोंढरे यांनी शुक्रवारी (दि.१ मे) रोजी आयोजित महाराष्ट्र दिन समारंभात बोलताना केले. 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या येवलेवाडी (ता. हवेली) येथील स्वर्गीय बबनराव खंडूजी कामठे माध्यमिक विद्यालय, श्रीमती जनाबाई काशिनाथ ओव्हाळ जुनिअर कॉलेज आणि हौसाई सेमी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या  प्रांगणामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी  प्रमुख पाहुणे लक्ष्मण कोंढरे आणि आणि त्यांच्या पत्नी  सविता कोंढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी  मुख्याध्यापक संतोष आबनावे, प्रायमरी शाळा विभागप्रमुख सारिका जगताप, किर्ती कामठे व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक संतोष आबनावे यांनी प्रास्ताविक केले. सिद्धनाथ गद्रे यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र सरोदे यांनी आभार मानले.